Thackeray Brothers : एकत्र लढले अन् बसला दणका, बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारूण पराभव, सगळ्याच उमेदवारांचा सुपडा साफ
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. तर फार चर्चेत नसलेल्या शशांकराव पॅनेलने अनपेक्षित यश मिळवले आहे.
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी अर्थात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी ‘उत्कर्ष पॅनेल’ या नावाने एकत्र निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. मात्र, या निवडणुकीचा निकाल दोन्ही ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक ठरला. ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळाली नाही. तर या निवडणुकीत, ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे. बेस्ट कर्माचारी सहकारी पतपेढीसाठी १८ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्टला लागणं अपेक्षित होतं. मात्र मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने निकाल लागण्यास उशिर झाला आणि मंगळवारी रात्री उशिरा हा निकाल जाहीर झाला.
दरम्यान, हा निकाल केवळ बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीपुरता मर्यादित नसून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असताना, या निवडणुकीतील पराभवाने त्यांच्या एकत्रित राजकीय वाटचालीस एक मोठा धक्का मानला जात आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

