Thackeray Brothers : राज अन् उद्धव यांच्या युतीचं पहिलं पाऊल, ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा असताना आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसे यांची युती होणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचं पहिलं पाऊल असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. बेस्ट पतपेढीची येत्या १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचाी सेना एकत्र लढणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत असून गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अशातच या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतील असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेचा आहे. अशातच बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी एक पत्रक जारी करून चर्चांना उधाण आणलंय. कारण त्यात ठाकरे ब्रँड असा उल्लेख असून बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकांची तारीखच जाहीर केली आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

