”…सरड्यांनी दुसऱ्याला अजगर बोलू नये”, नितेश राणे यांची राऊत यांच्यावर खोचक टीका
त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेमके कोणाचे आहेत, हे त्यांनाच माहिती नसल्यामुळे सरड्याला पण लाज वाटेल इतक्या वेळा ते रंग बदलतात.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपसह शिंदे गटावर हल्ला चढवला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना आपला निशाना केला. तसेच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्याबाबतीत ही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेमके कोणाचे आहेत, हे त्यांनाच माहिती नसल्यामुळे सरड्याला पण लाज वाटेल इतक्या वेळा ते रंग बदलतात. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत आहे, असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. तर तसेच कोणाच्या तरी तालावर, सुपारी घेऊन आणि दलाली करून नुसतं आग आणि काड्या लावण्याचं काम करतात.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

