जो भ्रष्टाचार केलात तो पक्ष म्हणून केलात की टोळी म्हणून; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना प्रश्न
आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. हे सर्व मंत्री हे सर्व खासदार जेव्हा आपल्याकडे होते, तेव्हा ते किती उत्तम काम करतात हे सांगणारा तुमचा पक्ष होता
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. तर शिंदे हे टोळी चालवतात अशी टीका राऊत यांनी केली होती. त्या टीकेला शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी आता चांगलेच उत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी तुम्हाला आमदार, खासदार आणि इतर नेते सोडूण गेल्यावरच ते टोळी कसे होतात असा सवाल केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी आहे. हे सर्व मंत्री हे सर्व खासदार जेव्हा आपल्याकडे होते, तेव्हा ते किती उत्तम काम करतात हे सांगणारा तुमचा पक्ष होता. पण आता ते तुम्हाला झिडकारून दुसरीकडे गेल्यावर टोळी कशी होते असे पावसकर यांनी म्हटलं आहे. तर मुंबई महापालिकेत जे काही तुम्ही करोड रुपये खाल्लेत ते पक्ष म्हणून खाल्लेत की टोळी म्हणून खाल्लेत. कोविड काळात जो काही भ्रष्टाचार तुम्ही केलात तेव्हा तो पक्ष म्हणून केलात की टोळी म्हणून केलात याचे उत्तर द्या असेही त्यांनी म्हटलं आहे.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

