अशोक चव्हाण भाजपात सामील होण्याआधी दिल्लीत रडले, सामनातून राऊतांचा मोठा दावा
दिल्लीत सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासमोर हात जोडून रडले, असे सामनातून म्हटले आहेत तर पक्ष सोडला नाही तर तुरूंगात जावे लागेल, असं आदर्श नेत्याने दिल्लीत सांगितलं असल्याची टीका सामनातून संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून काय केला हल्लाबोल?
काँग्रसचे आदर्श नेते भाजपात सामील होण्याआधी दिल्लीत जाऊन रडले, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत मोठा दावा केलाय. दिल्लीत सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासमोर हात जोडून रडले, असे सामनातून म्हटले आहेत तर पक्ष सोडला नाही तर तुरूंगात जावे लागेल, असं आदर्श नेत्याने दिल्लीत सांगितलं असल्याची टीका सामनातून संजय राऊत यांनी केली. ‘देशापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे होणे यालाच हुकूमशाही म्हणायचे. आज देशात तेच झाले. भाजपात गुलाम आणि डरपोक लोक एकत्र झाले आहेत. ईडी, सीबीआयच्या भयाने जे लटपटले ते सरळ भाजपात गेले. हा देश कधीकाळी शूरांचा व लढणाऱ्यांचा होता. भाजपच्या राजकारणाने हा देश नेभळटांचा आणि डरपोकांचा केला’, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून केलाय.

