नरेंद्र मोदी खोटारडे… त्यांच्या घोषणा भपंक आणि…. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
ईडी,सीबीआय, आय़कर विभाग, जीएसटी यासंदर्भातील ज्यांच्यावर कारवाया झाल्यात त्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने शुद्ध केलं. मोदी त्यांच्यांवर का बोलत नाही, तो विषय टाळून मोदी सर्व विषयांवर बोलताय? असा सवाल करत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केलाय.
नरेंद्र मोदी हे खोटं बोलतायंत. देशाचे पंतप्रधान नाही तर गुजरातचे भाजप नेते नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणा भंपक आणि खोट्या आहेत. इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून भाजपने केलेला घोटाळा भयंकर आहे. हे जर इतर देशात घडलं असतं तर त्या देशातील पंतप्रधानांना बडतर्फ केलं असतं किंवा त्याचा राजीनामा घेतला असता. त्याच्यावर भ्रष्टाचाराचा खटला चालवून त्याला तुरूंगात टाकलं असतं, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले, ईडी,सीबीआय, आय़कर विभाग, जीएसटी यासंदर्भातील ज्यांच्यावर कारवाया झाल्यात त्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपने शुद्ध केलं. मोदी त्यांच्यांवर का बोलत नाही, तो विषय टाळून मोदी सर्व विषयांवर बोलताय? असा सवाल करत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केलाय.
प्रश्न हा राजकीय किंवा गैरराजकीय नाही. प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्वशर्मा, सुवेंद्रू धर्माधिकारी यांना तुम्हीच भ्रष्ट म्हणत होतात. तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. आता त्यांच्यावर का बोलत नाही? तुमच्याकडे बोलण्याची स्क्रिप्ट नसेल तर आम्ही तयार करून देतो, असं म्हणत राऊतांनी समाचारच घेतला.