AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री दादा भुसे यांचे मिठ चोळणारं वक्तव्य; शिवसेना नेत्याची खरमरीत टीका, ‘शिंदे सरकारचं कांद्यानं वांदा केलाय...’

मंत्री दादा भुसे यांचे मिठ चोळणारं वक्तव्य; शिवसेना नेत्याची खरमरीत टीका, ‘शिंदे सरकारचं कांद्यानं वांदा केलाय…’

| Updated on: Aug 22, 2023 | 8:44 AM
Share

एकिकडे कांदा उत्पादक शेतकरी हवल दिल झाला असतानाच केंद्र सरकारने धक्कादायक निर्णय घेतला आणि शेतकरी संतापले. हा संताप रस्त्यावरही दिसत असतानाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्री हे वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. यात छगन भुजबळ, विजकुमार गावित यांनी अशी वक्तव्य करत वाद निर्माण केला आहे. त्याचदरम्यान आता आणखी एका मंत्र्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात तापमान वाढलं आहे.

मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | राज्यात सध्या तलाठी भरती आणि कांद्याच्या प्रश्नावरून राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानामुळे देखील वाद होत आहेत. तर मंत्री छगन भुजबळ, विजकुमार गावित यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सध्या सरकारवर टीका होत आहे. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी देखील धक्कादायक विधान केल आहे. त्यांनी नाशिक येथे बोलताना, कांदा खरेदी करताना ५० पन्नास रुपये जास्त दिल्यास काही फरक पडणार नाही. ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते? असा सवाल केला आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधकांसह शेतकऱ्यांकडून टीका होत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत दादा भुसे यांना टोला लगावला आहे. तर शिंदे सरकारचे कांद्यानेच एवढे वांदे करून टाकले आहेत. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील कांदा उत्पादकांनी आपली कांद्याची विक्री बंद करून टाकलेली आहे. सर्व खरेदी विक्री व्यवहार बंद झालेले आहेत. तर शासनाला ना जनाची आणि ना मनाची राहिलेली आहे. शेतकऱ्यानं मागच्या पावसाळ्याच्या वेळेला साडेतीनशे रुपयाचे अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. यात आत्ताचे मंत्री जे आहेत छगन भुजबळ यांची मागणी होती पण आज छगन भुजबळ त्याच मंत्रिमंडळात गेल्यानंतर ते विसरलेत. तर कांदा उत्पादकांच्या तोंडामध्ये फेस आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे.

Published on: Aug 22, 2023 08:44 AM