Marathi News Videos Thackeray leaders Advay Hire, Raju Shinde boath contesting elections against Eknath Shinde candidates will join BJP

Maharashtra Politics : भाजपचा ठाकरेंना दे धक्का… शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढणारे ठाकरेंचे 2 शिलेदार कमळ घेणार हाती
ठाकरे गटातील दोन महत्त्वाचे नेते, राजू शिंदे आणि अद्वय हिरे, यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे आणि मालेगावमधील अद्वय हिरे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेणार आहेत.
डोंबिवलीमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्यानंतर भाजपनं मालेगावमध्येही उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. मालेगाव येथील अद्वय हिरे आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढणारे ठाकरेंचे दोन खंदे शिलेदार भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनुक्रमे दादा भुसे आणि संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दुपारी तीन वाजता त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी हा महत्त्वाचा राजकीय लाभ मानला जात आहे.
Published on: Nov 18, 2025 2:23 PM
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट
NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?
तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..
भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?
Related Video
NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार?
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
ब्लड शुगर आणि पोटॅशियमची कमी? सोनम वांगचुक यांची कशी आहे तब्येत?
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...