8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती विजय निवडणुकीत विजयी कसा झाला? काय जादू झाली?
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डीएमके सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वांना चकित करत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने दमदार कामगिरी करत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. तामिळ सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळख असलेले विजय आता थेट राजकारणात मोठी झेप घेताना दिसत आहेत. या निवडणुकीत टीव्हीकेचा जाहीरनामा विशेष चर्चेत राहिला. महिलांना दरमहा २५०० रुपये, वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत, तसेच गरीब मुलींच्या विवाहासाठी ८ ग्रॅम सोनं आणि सिल्क साडी देण्यासारख्या आश्वासनांचा मतदारांवर मोठा प्रभाव पडल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या बाजूने कल दर्शवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात टीव्हीकेने बाजी मारत सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. चित्रपटसृष्टीत बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवल्यानंतर आता थलपती विजय राजकारणातही मोठी कामगिरी करताना दिसत असून, मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल ही लोकशाहीतील मोठी घडामोड मानली जात आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

