Thane Rain | ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले
ठाणे महापालिकेने नालेसफाई नीट न केल्यामुळे अनेक भागात पाणी साचत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे.(Thane Heavy Rain waterlogging in city)
ठाणे : ठाणे शहरात सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या ठाण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. (Thane Heavy Rain waterlogging in city)
यंदा ठाणे महापालिकेने नालेसफाई नीट न केल्यामुळे अनेक भागात पाणी साचत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पावसाचा जोर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा सकल भागात पालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पंप बसवणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?

