Mahayuti : महायुतीतच भाजप अन् शिंदे सेनेत खटके, ठाण्यात एकला चलो रे… महापौरपदावरून संघर्ष
ठाणे महापालिका निवडणुकीवरून महायुतीत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत तीव्र मतभेद समोर आले आहेत. शिंदे गटाने एकला चलो रेचा नारा दिल्यावर, भाजपनेही अबकी बार 70 पार आणि भाजपचा महापौर असा एल्गार पुकारला आहे. स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असून, महायुतीमधील हा संघर्ष वाढताना दिसत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तीव्र मतभेद समोर आले आहेत. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भाषा करत असल्याने स्थानिक पातळीवर युतीत संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकला चलो रेचा नारा देण्यात आला. त्यानंतर भाजपनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत देत अबकी बार 70 पार आणि ठाण्यात भाजपचाच महापौर होईल असा निर्धार व्यक्त केला.
भाजप आमदार संजय केळकर यांच्या महापौरपदावरील वक्तव्यावरून तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारावरून शिंदे गटात नाराजी असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी महायुती झाली तर ठीक, अन्यथा वेगळे लढणार असल्याचे म्हटले आहे, तर भाजपनेही गाफील न राहण्याचे संकेत दिले आहेत.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

