
ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग; पाहा व्हीडिओ…
ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळच्या ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. पाहा व्हीडिओ...
ठाणे : ठाण्यातील सिने वंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी, घोडबंदर रोड, ठाणे येथील ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. तळ मजला ते पाचव्या मजल्यापर्यंत ही आग लागलेली आहे. 80 ते 90 ऑफीस गाळ्यांना आग लागली आहे. घटनास्थळी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल पोहोचले. फायर ब्रिगेडची 5 वाहन, रेस्क्यू वाहन 2, वॉटर टँकर 5 आणि जम्बो वॉटर टँकर 2 वाहन घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी ओरियन बिझनेस पार्क मधील पझल पार्किंग मधील 8 ते 9 वाहनांना आग लागली आहे. घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.आगीचे कारण अजून अस्पष्ट असून या आगीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहिती नुसार कोणतीही जीवितहानी आलेली नाही.
Published on: Apr 19, 2023 10:29 AM
Related Video
पापाराझींना मर्यादा ओलांडल्यानंतर भडकली झरीन खान, नेमकं झालं तरी काय?
एकेकाळी फक्त 50 रुपये कमाई, आता 'तारक मेहता..'साठी दररोज दीड लाख रुपये
'तारक मेहता..'मध्ये आता दिसणार नाही जेठालाल ? निर्मात्यांनी सोडलं मौन
भावी कॅबिनेट मंत्री... धनंजय मुंडेंच्या बॅनर्सने चर्चेला उधाण
भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, होर्मुज खाडीत भयंकर स्थिती, थेट युएईने..
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड