AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नघटिका जवळ येत असताना नववधू लिफ्टमध्ये अडकली अन्...

लग्नघटिका जवळ येत असताना नववधू लिफ्टमध्ये अडकली अन्…

| Updated on: May 30, 2023 | 7:48 AM
Share

VIDEO | ... अन् नववधू लिफ्टमध्ये अडकली, वऱ्हाडी नवऱ्यामुलीची वाट पाहत होते तर दुसरीकडे कुटुंबियांचा जीव टांगणीला, नेमका काय घडला प्रसंग

ठाणे : लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. पाहुण्यांची लगबग सुरू होती. वर लग्नामंडपात वधूची वाट बघत बसला होता. लग्नघटिका जवळ येऊ लागली आणि वधू विवाहस्थळी पोहोचण्यासाठी निघाली…पण लिफ्टमध्ये असताना अचानक लिफ्ट बंद पडली अन् ती अडकली. याप्रकारामुळे सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. या घटनेनंतर अग्निशनम दलाच्या जवानानांना बोलावण्यात आलं आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न २० मिनिटांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या वधूला बाहेर काढलं. रात्री ८ च्या मुहूर्तापूर्वी हे बचाव कार्य यशस्वी झालं आणि वधू वराचं लग्न सुखरूप पार पडलं. सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास भाईंदर येथे ही घटना घडली. भाईंदर येथे राहणार्‍या प्रिती वागळे या तरुणीचं सोमवारी लग्न होतं. भाईंदर पश्चिमेच्या राई येथील विनायक नगर येथील सभागृहात लग्न सोहळा सुरू होता. रात्री ९ चा मुहूर्त होता. सगळे जण वधूची वाट बघत होते. तयारी करून रात्री सव्वा आठच्या सुमारास नवरी मुलगी आपल्या तीन बहिणी आणि दोन लहान बाळासोबत तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली. मात्र अचानक लिफ्ट बंद पडली. लिफ्टमध्ये अडकल्याचे संकट एकीकडे तर दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त चुकण्याची भीती. कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला. या प्रसंगाची माहिती अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीही पोहोचेले. २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर उदवहनात अडकलेल्या वधूसह इतरांची सुटका कऱण्यात आली आणि तिचे लग्न सुखरूप पार पडले.

Published on: May 30, 2023 07:48 AM