VIDEO : Kolhapur Flood | कोल्हापुरात महापूर, रेशनचं धान्य खड्ड्यात पुरण्याची वेळ

कोल्हापुरात महापूर आल्याने रेशनचे धान्य खराब झाले आहे. आता हे धान्य खड्ड्यात पुरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 2019 च्या महापुरानंतर मोठ्या कष्टाने सावरलेले अनेकांचे संसार यावेळी पुन्हा एकदा पंचगंगेच्या पाण्यात वाहून गेले.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर आता ओसरायला सुरुवात झाली. मात्र पाणी जस जसं कमी होतंय तस तसं या महापुराने (Kolhapur rain) घातलेल्या थैमानाची विदारक दृश्य सुद्धा समोर येत आहेत. 2019 च्या महापुरानंतर मोठ्या कष्टाने सावरलेले अनेकांचे संसार यावेळी पुन्हा एकदा पंचगंगेच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे आता पुन्हा यातून उभारी घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये उरलेली नाही. कोल्हापुरात महापूर आल्याने रेशनचे धान्य खराब झाले आहे. आता हे धान्य खड्ड्यात पुरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI