अजितदादांना पक्षचिन्हं मिळालं, पण जागांचं काय? पश्चिम महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब?
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ज्या जागा पक्ष लढत होता त्यापैकी अनेक जागा राष्ट्रवादीच्या जागा भाजपसाठी सोडाव्या लागल्यात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडल्याचे पाहायला मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून घड्याळ चिन्ह गायब होऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ज्या जागा पक्ष लढत होता त्यापैकी अनेक जागा राष्ट्रवादीच्या जागा भाजपसाठी सोडाव्या लागल्यात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीची मालकी अजित पवार यांना दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी वाढीचा संकल्प घेतलाय. नव्या उमेदीची ग्वाही देत चिन्ह तेच वेळ नवी, या नाऱ्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेतृत्वाची वाटचाल सुरू झाली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात पुणे शिरूर वगळता पश्चिम महाराष्ट्रातून घड्याळ गायब झालंय. यापूर्वी साताऱ्यातून राष्ट्रवादी लढत होती तिथे भाजपनं उमेदवार दिलाय. मविआकडून शरद पवार यांचे शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. माढ्याची जागाही भाजपकडे गेली. तर धैर्यशील मोहितेंना शरद पवार गटाने तिकीट दिलंय. नगरमध्येही राष्ट्रवादीची जागा भाजपकडे गेली तर शरद पवार गटाने निलेश लंकेंना तिकीट दिलंय. आणखी कुणाची जागा कुणी घेतली बघा स्पेशल रिपोर्ट…
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

