धावती ट्रेन पकडताना प्रवासी खाली पडला, घटना सीसीटीव्हीत कैद

त्यावेळी तिथं ऑन ड्युटी असलेल्या जवानाने जिवाची पर्वा न करता धाडस करून प्रवाशांचा जीव वाचवला. ही घटना वर्धा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर घडली.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 24, 2022 | 12:14 PM

वर्धा – रेल्वेचे (Wardha Junction) अनेक अपघात आपण सीसीटिव्हीच्या (CCTV) माध्यमातून पाहत असतो. काही क्षणाचा विलंब झाला असता, तर हा वाचला असता असा शब्द अनेकदा आपल्या तोंडातून व्हिडीओ पाहताना बाहेर पडतो. अशीच एक घटना वर्ध्यामध्ये घडली आहे. धावती रेल्वे पकडणाऱ्या एकाचा तोल गेला. तो रेल्वेसोबत सरपडत जाऊ लागला. त्यावेळी तिथं ऑन ड्युटी असलेल्या जवानाने जिवाची पर्वा न करता धाडस करून प्रवाशांचा जीव वाचवला. ही घटना वर्धा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर घडली. जीव वाचल्याने प्रवाशाने सुरक्षा बलाच्या रक्षकाचे (Security guard) आभार मानले आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सिसिटीव्हीत कैद झाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें