Special Report | भीषण अपघाताच्या काळीज पिटाळणाऱ्या कहाण्या
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर खाजगी बसला अपघात झाला आणि 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे महाराष्ट्रासह देश सुन्न झाला. तर आधी बसचा टायर फुटल्याने ती पलटली. तर डिझेल टॉकी फुटून स्फोट झाल्याने आग लागल्याचे कारण समोर येत होते.
मुंबई : 1 जुलैची मध्य रात्र ही विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बस नागपुरहून पुणे प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांसाठी काळरात्र ठरली. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर खाजगी बसला अपघात झाला आणि 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे महाराष्ट्रासह देश सुन्न झाला. तर आधी बसचा टायर फुटल्याने ती पलटली. तर डिझेल टॉकी फुटून स्फोट झाल्याने आग लागल्याचे कारण समोर येत होते. तर आरटीओ अहवालात टायरच फुटला नसल्याचे उघड झाले. त्यामुळे नेमका हा अपघात टायर फुटल्याने झाला की ड्रायव्हरला डुलकी लागल्याने झाला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मात्र या अपघातात नियतीच्या फेऱ्यात अनेकांच्या स्वप्नांचा कोळसा झाला असून आता भीषण अपघाताच्या काळीज पिटाळणाऱ्या कहाण्या उघड होत आहेत. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

