कोल्हापुरातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं, बघा धरणाची विहंगम ड्रोन दृश्य
VIDEO | राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, बघा विहंगम ड्रोन दृश्य
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं नागरिकांना झोडपून काढलं आहे. मुंबईसह पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ठाणे,रत्नागिरी, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २८ गावांतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणात मोठा पाणी साठा जमा झाला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानंतरची ड्रोन दृश्य खास तुमच्यासाठी…
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

