नाशिकरांसाठी महत्वाची बातमी! अखेर सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला, संप मिटला
मागील दोन महिन्यांचे वेतन थकल्यामुळे सिटी लिंक बसच्या वाहकांनी दोन दिवसांपुर्वी संपाचे हत्यार उपसले होते. तर मागण्या मान्य होईपर्यंत काम सुरू न करण्याचा मानस कर्मचाऱ्यांनी केला होता.
नाशिक, 20 जुलै 2023 | शहर महापालिकेचा सिटी लिंक बससेवा प्रकल्पाला दिवसेंदिवस ब्रेक लागताना दिसत आहे. मागील दोन महिन्यांचे वेतन थकल्यामुळे सिटी लिंक बसच्या वाहकांनी दोन दिवसांपुर्वी संपाचे हत्यार उपसले होते. तर मागण्या मान्य होईपर्यंत काम सुरू न करण्याचा मानस कर्मचाऱ्यांनी केला होता. यादरम्यान नाशिककरांना हाल सोसावे लागले होते. पण आता नाशिकरांसाठी महत्वाची बातमी आली असून सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. याची माहिती माहिती सिटी लिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी चालविण्यात येणार्या सिटीलिंक या बस सेवेतील चालक आणि वाहक हे दोन्हीही ठेकेदाराच्या माध्यमातून कामकरतात. मात्र मागील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे संप पुकारला होता. तर सुमारे पाचशे कर्मचारी हे संपावर गेले होते. ज्यामुळे शहरातील नागरिकांना अतिशय हाल सहन करावे लागले होते. मात्र आज संपावर तोडगा काढण्यात आला आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

