भर पुरात पोहत वीज पुरवठा केला सुरळीत, वाशिममधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल

रिठद गावात आलेल्या पुरात रोहित्र पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत त्या ठीक करण्यासाठी भर पुरात पोहत जात महावीतरणचे कर्मचारी रामभाऊ सखाराम बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या भर पावसातील ह्या कामाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

वनिता कांबळे

|

Aug 09, 2022 | 12:15 AM

वाशिम : वाशिम(Washim) जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावात पाणी शिरले आहे. अश्यात बंद झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी( employees of Mahavitaran) शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रिठद गावात आलेल्या पुरात रोहित्र पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत त्या ठीक करण्यासाठी भर पुरात पोहत जात महावीतरणचे कर्मचारी रामभाऊ सखाराम बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या भर पावसातील ह्या कामाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पुरात वाहून जाऊ नये म्हणून कमरेला दोरखंड बांधून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें