AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal | छापेमारीचा डाव भाजपवरच उलटेल, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

Chhagan Bhujbal | छापेमारीचा डाव भाजपवरच उलटेल, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 5:58 PM
Share

ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व यंत्रणांचा अतिरेकी वापर सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटेल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व यंत्रणांचा अतिरेकी वापर सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला हा डाव त्यांच्यावरच उलटेल, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. छगन भुजबळ चंद्रपुरात आले होते. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करत आहे. सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, भाजप यंत्रणांच्या बळावर सरकार बनवू शकत नाही, असं सांगतानाच राज्यातील आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.

Published on: Oct 19, 2021 05:22 PM