AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | हे सरकार गरिबांचं सरकार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Devendra Fadnavis | हे सरकार गरिबांचं सरकार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 19, 2021 | 9:46 PM
Share

राज्यातील आघाडी सर्व सामान्यांचं राहिलं नाही. हे सरकार काम करताना दिसत नाही. हे सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चढवला.

राज्यातील आघाडी सर्व सामान्यांचं राहिलं नाही. हे सरकार काम करताना दिसत नाही. हे सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चढवला. लाखणी येथे उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता देवेंद्र फडणवीस यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. हे सरकार सामान्य माणसांचं नाही. सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असं सांगतानाच हे सरकार हरवलं असून शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असं फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना धानाचा बोनस देण्याची सुरुवात केली. पूर्वी आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या सरकारने बोनसच बंद केला आहे, असं सांगतानाच नाना पटोले म्हणतात संविधान खतरे में है. पण खरेत कर धान पीक घेणारे शेतकरीच खरे खतरे में आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला. आम्ही 5 वर्षात एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर 4 शेतकऱ्यांनी वीज भरली नाही तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा