AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | जे संसदेतल्या लॉबीत उत्तम काम करतात ते पुन्हा पुन्हा संसदेत जातात-tv9

Sanjay Raut | जे संसदेतल्या लॉबीत उत्तम काम करतात ते पुन्हा पुन्हा संसदेत जातात-tv9

| Updated on: Jun 01, 2022 | 9:22 PM
Share

राष्ट्रीय एकात्मतेवर, धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारे पर्याय टिकत नाहीत. आता मला वाटतंय की पंतप्रधान पदही लोकपालाच्या कक्षेत यायला हवं, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाना साधला आहे. मुंबईतल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे रोज चर्चेत असतात. मुद्दा कुठलाही असो राऊतांचं टार्गेट हे ठरलेलं असतं. आज संजय राऊत यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीची नोटीस आल्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. मात्र त्यांनी यावेळी काँग्रेसलाही जोरदार टोलेबाजी केली आहे. संजय राऊत यांची महाविकास आघाडीत काँग्रेस सामील झाल्यापासून टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र यावेली त्याला कारण ठरलंय राज्यसभा निवडणूक आणि इम्रान पतापगडी यांची उमेदवारी. आज काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान तुमच्यापेक्षा आमच्यावर आलंय. तर जे संसदेतल्या लॉबीत उत्तम काम करतात ते पुन्हा पुन्हा संसदेत जातात असाही टोला यावेळी संजय राऊत लगावला.

Published on: Jun 01, 2022 09:22 PM