ठाणे पोलीस शाळेच्या email-id वर ठाण्यातील शाळा, कॉलेज, रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवण्याची धमकी?

ठाण्यातील कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या मेल आयडीवर शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 23, 2022 | 7:46 PM

ठाण्यातील कोर्टनाका येथील ठाणे पोलीस शाळेच्या मेल आयडीवर शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस स्कूलच्या मेलवर लष्कर-29 लष्कर 22 ॲट दि रेट प्रोटोनमेल डॉट कॉम या मेलवरून मिशन 22 असा विषय लिहिलेला एक मेल आला होता. त्यांनी हा मेल उघडला असता “मै जावेद खान लष्कर 29 का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ …. हमारा एकही मक्सद है, पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो.. तभी यह देश प्रगती करेगा. इस लिए हमने दो मार्गो का स्विकार किया है कुर्बानी.. और धमाका..” लष्कर 29 मे कई मुजाहिद सदस्य है, जो हर घर मे जिहाद पहुँचाना चाहते है.. लष्कर 29 जिहाद को मानने वाली हिंदुओ की संघटना है..’

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें