Kalyan Monsoon News : उल्हास नदीत 3 गुराखी अडकले; 2 तरुणांनी जीव धोक्यात घालून प्राण वाचवले
Ullhas river rescue : उल्हास नदीच्या पत्रात अडकलेल्या तिघांची सुटका मोहिली येथील स्थानिक तरुणांनी केलेली असल्याने त्यांचं कौतुक होत आहे.
कल्याणच्या मोहिली गावात उल्हास नदीत अडकलेल्या तीन गुरख्यांना स्थानिक तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले आहे. दोन धाडसी स्थानिक तरुणांनी जिवाची पर्वा न करता या बेटावर अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका केली असल्याने त्यांच कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या संकटात तीन गुराखी अडकले होते. पावसामुळे नदीची पातळी वाढल्याने मोहिली गावाजवळ बेट तयार झाले आणि गुरे चरायला गेलेले तीन गावकरी तिथे अडकले. घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने बचावकार्य करणे कठीण झाले. याच वेळी गावातील दोन तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बोटीद्वारे बेटावर अडकलेल्या तिघांची यशस्वी सुटका केली.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

