VIDEO : BJP Andolan | अमरावती हिंसाचार प्रश्नी भाजपचं राज्यभर धरणं आंदोलन

राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप पक्षाच्या (BJP Agitation ) वतीने आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Aurangabad collector office)  भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप पक्षाच्या (BJP Agitation ) वतीने आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Aurangabad collector office)  भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.ग्रामीण आणि शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात आमदार अतुल सावे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे आदींची उपस्थिती होती. 12 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. त्यानंतर राज्यातील काही ठिकाणी या दिवशी हिंसक कारवाया घडून आल्या. त्याचे पडसाद अमरावतीसह अन्य काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उमटले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI