VIDEO : TOP 9 News | महत्वाच्या टॉप 9 न्यूज | 11 AM | 18 June 2021

मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक महापालिकेच्या निवडणुका लांबीवर पडल्या आहेत. मात्र, आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्याही कमी झाली असून, यामुळे मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. सीबीएसईने सांगितले की दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डचा निकालाच्या आधारावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाईल. सीबीएसईचा निकाल 31 जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिली. त्यासंदर्भात आज बारावी निकालाबाबत बैठक होणार आहे.