TOP 9 News | कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

1) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणला भेट दिली. तसेच या भागातील पूरस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

2) मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यात नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. आपले गाऱ्हाने मांडताना येथील नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

3) मुख्यमंत्र्यांसोर व्यथा मांडताना चिपळूण येथे व्यापाऱ्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले. यावेळी व्यापाऱ्यांनी साहेब तुम्ही आमचे मायबाप आमच्यासाठी काहीतरी करा, अशी ठाकरे यांना विनंती केली.

4) लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI