Toxic Syrups Alert : पालकांनो सावध व्हा! सतर्क राहूनच मुलांची औषधं खरेदी करा, कोल्डरीफनंतर आणखी 2 सिरपमध्ये भेसळ
कोल्डरीफ या खोकल्याच्या औषधानंतर मध्य प्रदेशात रेस्पी फ्रेश टीआर आणि रिलीफ या दोन औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक आढळून आला आहे. या घटकामुळे लहान मुलांच्या औषधातून १६ हून अधिक मुलांचे जीव गेले आहेत.
औषधांमध्ये भेसळ आणि विषारी घटकांच्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोल्डरीफ या खोकल्याच्या औषधानंतर आता मध्य प्रदेशात रेस्पी फ्रेश टीआर (Respi Fresh TR) आणि रिलीफ (Relief) या आणखी दोन औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) हा विषारी घटक आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेश सरकारने केलेल्या चौकशीतून ही धक्कादायक बाब उघड झाली असून, दोन्ही औषधे गुजरात राज्यातील कंपन्यांनी तयार केली आहेत. डायथिलीन ग्लायकोल हा घटक वाहन दुरुस्तीमध्ये ब्रेक ऑइल म्हणून वापरला जातो, तसेच तो इंजिन थंड ठेवण्यासही मदत करतो. औषधे थंड राहावीत या उद्देशाने लहान मुलांच्या औषधांमध्ये या विषारी घटकाचा वापर झाल्याने आतापर्यंत १६ हून अधिक मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीत पुण्यातही अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत बनावट कफ सिरपचा साठा जप्त केला आहे.
Published on: Oct 10, 2025 04:28 PM
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
