TV9 Marathi no.1 | महाराष्ट्रात ‘tv9 मराठी’चा दबदबा, बार्क रेटिंगमध्ये अव्वल

| Updated on: Mar 17, 2022 | 1:58 PM

महाराष्ट्रात (maharshtra)  'टीव्ही 9 (Tv9 )मराठी'चा दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत.

Follow us on

महाराष्ट्रात (Maharashtra)  ‘टीव्ही 9 मराठी’चा (tv9 Marathi) दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तब्बल 74 आठवड्यांनंतर बार्कने रेटिंग जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ अव्वल ठरली आहे. ऐन होळीच्या दिवशी ‘टीव्ही 9 मराठी’ने रंगांची उधळण केली आहे. 29 रेटिंग मिळवत ‘टीव्ही 9 मराठी’ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ हे रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर पोहोचणारे पहिले मराठी न्यूज चॅनेल ठरले होते. युद्धापासून महाराष्ट्रातील राजकीय बातम्या, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, यांचे सुपरफास्ट अपडेट्स ‘टीव्ही 9 मराठी’ने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळेच प्रेक्षकांनीही आपल्या प्रेमाची पोचपावती म्हणून ‘टीव्ही 9 मराठी’वर पसंतीची मोहोर उमटवली आहे.