अर्धवट खाल्लेले पदार्थ, खेळण्या अन् भयाण शांतता; बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचे प्रतिनिधी ग्राऊंड रिपोर्ट घेऊन आले आहे. सध्या या ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळत आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचे प्रतिनिधी ग्राऊंड रिपोर्ट घेऊन आले आहे. ज्या ठिकाणी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्या बैसरन खोऱ्यात सध्या शुकशुकाट पसरला आहे. हल्ला झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटकांसह याठिकाणी असलेले स्थानिक व्यापारी देखील आपलं सगळं समान सोडून तिथून पळाले. त्यामुळे आज ही जागा एखाद्या अस्ताव्यस्त झालेल्या खाणाखुणा दिसत आहे. हल्ला होण्याच्या काहीवेळा आधी या ठिकाणी उत्साह, आनंदाचं वातावरण असणार हे या ठिकाणी पडलेल्या सामानावरून समजतं आहे. हॉटेलमध्ये बनवलेले पदार्थ, अर्धवट खाल्लेल्या अन्न पदार्थांच्या प्लेट्स, खेळण्याच्या वस्तु, पाण्याच्या बाटल्या अशा अनेक गोष्टी इथे अजूनही पडलेल्या आहेत. हल्ला झाला त्यावेळी याठिकाणी 2 ते अडीच हजार पर्यटक आणि नागरिक याठिकाणी उपस्थित होते. सध्या या परिसरात भयाण शांतता बघायला मिळत आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

