आदित्य ठाकरे- पियुष गोयल यांच्यात रंगलं ट्विटर वॉर, काय आहे मुद्दा ?
मुंबईतील पेटंट कार्यालयाच्या मुद्यावरून लवकरच मोठा वाद पेटू शकतो. हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या आरोपानंतर पियुष गोयल यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं
मुंबईतील पेटंट कार्यालयाच्या मुद्यावरून लवकरच मोठा वाद पेटू शकतो. हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या आरोपानंतर पियुष गोयल यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कार्यालय नव्हे तर फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं उत्तर गोयल यांनी दिलं आहे. आणि हे विभाग का हलवण्यात आले, याची कारणही त्यांनी दिली आहेत. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं मुख्य कार्यालय हे वडाळ्यात आहे. आणि याच कार्यालयावरून आता आदित्य ठाकरे आणि पियुष गोयल यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क नियंत्रक जनरलचं वडाळा अँटॉप हिल येथील कार्यालय मुंबईतून दिल्लीत का हलवण्यात येतंय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत विचारला होता. मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी पियुष गोयल यांच्यावर कली. त्याला गोयल यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

