KDMCतील मनसेचे दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. निवडणुका हाता तोंडावर आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 06, 2022 | 3:26 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेची (kdmc) निवडणूक तोंडावर असतानाच मनसेला (mns) जबरदस्त धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें