‘… हा पत्रकारांचा अपमान’, संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृत्यावर बोलताना शिवसेना नेता आक्रमक

‘… हा पत्रकारांचा अपमान’, संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृत्यावर बोलताना शिवसेना नेता आक्रमक

Harshada Shinkar | Updated on: Jun 05, 2023 | 8:06 AM

VIDEO | संजय राऊत यांच्या 'त्या' कृत्यावरून शिवसेना नेत्याचा यांच्यावर निशाणा, काय म्हणाले बघा?

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर प्रश्न विचारला असता त्यांच्यावर बोलण्यापूर्वी संजय राऊत थुंकल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावरून राजकीय वर्तुळात थुकण्यावरून नवा वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राऊतांच्या या कृतीवर भाष्य करताना म्हटले की, सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे. तर यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांना चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत’, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. अशातच शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही यावर भाष्य केले. उदय सामंत म्हणाले, ‘महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आहे. राजकीय संस्कार आणि वारसा काय असतो या दोन्ही बड्या नेत्यांनी दाखवले आहे. यापूर्वी अशा पद्धतीने वर्तण केले नव्हते. तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या प्रश्नावर थुंकणे हा पत्रकारांचा अपमान आहे. ‘, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Jun 05, 2023 8:01 AM
Follow Us