Uday Samant | नारायण राणेंनी प्रहाराची भाषा करु नये, आम्हीच त्यांच्यावर प्रहार करतो, उदय सामंतांची खोचक टीका

शिवसेना नेत्यांकडून नारायण राणेंना उत्तर देण्यात येत आहे. नारायण राणेंनी प्रहाराची भाषा करू नये, आम्ही त्यांच्यावर प्रहारचं करत आलोय. म्हणून मी चार वेळा कोकणातून निवडून आलोय, असं उदय सामंत म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहार वृत्तपत्रातून हार आणि प्रहार या सदराद्वारे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेना नेत्यांकडून नारायण राणेंना उत्तर देण्यात येत आहे. नारायण राणेंनी प्रहाराची भाषा करू नये, आम्ही त्यांच्यावर प्रहारचं करत आलोय. म्हणून मी चार वेळा कोकणातून निवडून आलोय, असं उदय सामंत म्हणाले. पहिल्या दिवशी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचा तुरळक प्रतिसाद मिळाला यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले राज्यातील प्रमुख शहरात महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. मी स्वतः विद्यार्थ्यांची महाविद्यालयात जाऊन जनजागृती करतोय. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचं काम केलं जातंय. सध्या तरी दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच सध्या तरी प्रवेश मिळणार कारण ही नियमावली केंद्र सरकारची आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI