Udayanraje Bhosale Video : महाराजांवरून गरळ ओकणाऱ्यांवर राजे भडकले अन् म्हणाले, ‘…त्याची नसबंदी करा’
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर गरळ ओकणाऱ्यांवर उदयनराजे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलीये. अशी वक्तव्य करणाऱ्यांची नसबंदी करा, कायदा आणा अशी मागणी उदयनराजे यांनी केलीये.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना उद्देशून गरळ ओकणाऱ्यांवर खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. सरकारने महापुरुषांवर बोलणाऱ्या लोकांची नसबंदी करण्यासाठी थेट कायदा करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी याच अधिवेशनात कायदा करण्याचा आवाहन देखील उदयनराजे यांनी केला आहे. “मेलो तर चालेल पण याला खात्मा करणार अशी वेळ येऊ देऊ नका” असा संतापजनक इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर आणि त्यामागोमाग प्रशांत कोरेटकरना महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दोघांवरही कडक कारवाईची मागणी राजकीय नेत्यांसह शिवप्रेमींकडून करण्यात आली. तर प्रशांत कोरेटकर वरून समाचार घेत विकृत लोकांना कोणताही जात आणि पक्ष नसतो असं उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर काही दिवसांपूर्वी कोणती वादग्रस्त वक्तव्य झाली. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरेटकर काय म्हणाला ते पाहूया…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

