… हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
भाजपचे मंत्री नारायण राणे यांची लोकसभेसाठी भाजपकडून अद्याप उमेदवारी का जाहीर झाली नाही? असा सवाल कर हा अपमान नाही का? असे वक्तव्य करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना उपरोधीक टोला लगावला
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे मंत्री नारायण राणे यांची लोकसभेसाठी भाजपकडून अद्याप उमेदवारी का जाहीर झाली नाही? असा सवाल कर हा अपमान नाही का? असे वक्तव्य करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना उपरोधीक टोला लगावला आहे. यावेळी वैभव नाईक यांनी थेट भाजपला सवाल केलाय. ऐवढे दिवस होऊनही नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी का जाहीर केली नाही, ही नारायण राणेंची अवहेलना नाही का? असा सवाल वैभव नाईक यांनी केलाय. पुढे ते असेही म्हणाले की, कोकणाचा सर्व्हे नारायण राणे यांच्या विरोधात असल्याचं समजल्यामुळेच उमेदवारी देत नाहीत का? असाही उलट सवालही वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना केलाय.
Published on: Apr 14, 2024 05:08 PM
Latest Videos