Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE: आमच्यातला अंतरपाठ हा..; एकत्र येण्याच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi: वरळी डोम येथेल विजय मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या मुद्द्यावर मोठं विधान केलं
आमच्या दोघातील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी, असं मोठं विधान राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या विषयावर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आज हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून वरळी डोम येथे विजय मेळावा घेण्यात येत आहे. यावेळी ठाकरे बंधु तबवळ 18 वर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले आहे.
यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मला कल्पना आहे. अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतं. कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो. या भोंदूपणा विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत. राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. पंचायत अशी त्यांनी मला सन्मानिय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना सन्मानिय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनींनो. अप्रतिम मांडणी राजने केलीय. माझ्या भाषणाची काही गरज आहे, असं वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचं लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वजण समोर बसले. पक्षभेद विसरून मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली त्या सर्वांचे आभार मानतो, अशीही भावना यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या

मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल

...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा

विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
