VIDEO : ठाकरे अन् बावनकुळे आमने-सामने, विधानभवनाच्या लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन् नंतर…
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून उद्धव ठाकरे आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून उद्धव ठाकरे आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनादरम्यान अनेक अशा काही गोष्टी घडतात त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना पाहायला मिळते. आज विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे समोरून येत असातना गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखून पाहताना दिसले तर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असताना अधिवेशनासाठी आलेल्या उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचीची चर्चा होतेय. विधानभवनात उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे समोरा समोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केल्याचे दिसले मात्र, लिफ्टमधून एकत्र प्रवास करताना या दोघं बड्या नेत्यांमध्ये कोणता संवाद झाला, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, गेल्या अधिवेशनादरम्यान, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला होता. त्यावेळीही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.