‘ते गयेगुजरे लोकं… त्यांना 4 वेळा आमदारकी दिली, त्यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज दिल्या…’, राऊतांचा हल्लाबोल कोणावर?
ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे, त्यांचं मुस्लिम प्रेम कसं आहे. हे मी सांगू शकतो. थोरले की धाकले बंधूंबद्दल मोदींनी आपुलकीने ट्विट केलं आहे. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे. हे देशासाठी योग्य नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर संताप व्यक्त केला.
काँग्रेस नेते किरण काळे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर चांगला निशाणा साधला. आज गाडगेबाबांचं स्मरण केलं पाहिजे. धर्म जगायचा असतो. सांगायचा नसतो, असं गाडगेबाबा नेहमी सांगायचे. ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे, त्यांचं मुस्लिम प्रेम कसं आहे. हे मी सांगू शकतो. थोरले की धाकले बंधूंबद्दल मोदींनी आपुलकीने ट्विट केलं आहे. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे. हे देशासाठी योग्य नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर संताप व्यक्त केला. दरम्यान माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण करणं हे यांचं हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया इन्शुरन्स बुडाली, ज्यांच्यामुळे बुडाली त्यांचं रक्षण करणं भाजपचं हिंदुत्व आहे का? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला. यावेळी ठाकरेंसह राऊतांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली. मी अशा गयागुजऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्यांनी राजकारणात चांगभलं केलं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केलं. महिला आघाडीचा विरोध असताना त्यांना आमदारकी दिली. विधान परिषदेचं उपसभापती बनवलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडीज दिल्या का? पावत्या घेऊन याव्या, असं म्हणत संजय राऊत यांनी आव्हानच दिलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

