उद्धव ठाकरे सहकुटुंब राज यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी दाखल
शिवसेना सोडून गेल्यानंतर तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे आपले चुलत बंधू राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहे. गणरायाच्या निमित्ताने या दोघा भावंडांची भेट होत आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे चुलत बंधू पुन्हा एकत्र येणार का ? मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसे हे दोघे बंधू एकत्र येणार का ? याची चर्चा प्रसारमाध्यमातून सुरु असताना आज गणेश चतुर्थी निमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती सणाच्या निमित्ताने दाखल झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीची बोलणी आणखीन पुढे गेली असल्याचे यावरुन म्हटले जात आहे.या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांना गणराय सुबुद्धी देवो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

