AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....

ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच….

| Updated on: Jul 01, 2026 | 9:32 AM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काल विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी अर्ज भरला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय धक्के बसत आहेत. 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काल विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी अर्ज भरला. सुत्रांच्या माहितीनुसार ते तीन दिवसांपासून शिंदेंच्या संपर्कात होते. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काल वरळीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला विभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांनी बोलताना पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. “आजही इथे सच्चे शिवसैनिक उपस्थित आहेत. शाखेपासून काम करणारे कार्यकर्ते पक्षासाठी मेहनत घेत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या बंडाचा उल्लेख करत जुन्या काळातील संघर्षाची आठवण करून दिली. तसेच काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

Published on: Jul 01, 2026 09:32 AM

Follow Us
CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!.

CJP Parliament March : तिकडे हजारो कॉकरोच रस्त्यावर, इकडे जे पी नड्डा यांची CJP सोबत बैठक, 3 मोठ्या मागण्या समोर!

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?.

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो.

अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद.

मोठी बातमी! कॉकरोच इफेक्ट… आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो विस्कळीत, 5 स्थानके बंद

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं, याचं श्रेय तुम्हालाच… संजय राऊतांनी मानले सरन्यायाधीशांचे आभार; ट्विट चर्चेत

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं.

CJP Protest: और मारो.. तरुणांचा आक्रोश, पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून मारलं