पोट निवडणूक ‘मविआ’ लढणार की नाही? जर निवडणूक लढलीच तर… काय म्हणाले संजय राऊत?
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी लढवणार की नाही, याबाबत अद्याप गुढ कायम
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी लढवणार की नाही, याबाबत अद्याप गुढ कायम आहे. दरम्यान, काल मातोश्रीवर ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची बैठक झाली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय उद्या होणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीत अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे असे राष्ट्रवादीचे बडे नेते हजर होते. यावेळी दोन्ही पोटनिवडणुकीवर कोणता निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात आली. मात्र उद्या त्यावर पुन्हा चर्चा करून निर्णय घेऊ, असे संजय राऊत म्हणाले. जर निवडणूक लढवलीच तर जी चिंचवडची जागा आहे ती शिवसेनेने लढावी, असे आमचे मत आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा सेनेने लढावी, असे आमचं मत आहे. कसबा येथील निर्णय राष्ट्रवादी घेईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...

