Saamana Editorial Video : ‘सामना’तून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका, निर्मला सीतारामन यांचा ‘खडूस’ असा उल्लेख अन्…
यंदाच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. दरम्यान, या केंद्रीय अर्थसंकल्पावरून ठाकरे गटाकडून अर्थात सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
नुकताच देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य आणि नोकदारवर्गाला मोठा दिलासा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. दरम्यान, या केंद्रीय अर्थसंकल्पावरून ठाकरे गटाकडून अर्थात सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘काळा पैसा आणि बनावट नोटांचा देशात सुळसुळाट सुरू आहे. त्यावर अर्थसंकल्पात कुठलाही तोडगा नाही, पण 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा करून हे सरकार लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहे.’, असं सामनातून म्हटलं आहे. तर मध्यमवर्गीयांनी मोठ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात मतदान केले. त्या मतांची चोरी करून भाजपने विजय मिळविला. भाजपच्या विजयाने मध्यमवर्गीय खूश नाही. त्यांना खूश करण्यासाठी 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याचा फंडा आणला, पण सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचाच हा प्रकार असल्याचेही सामना अग्रलेखातून म्हटलं आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांचा ‘खडूस’ असा उल्लेखही यातून करण्यात आला आहे. ‘निर्मला सीतारामन या ‘खडूस’ बाईने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही भक्तांचे टाळ्या वाजवणे संपलेले नाही. जणू काही सामान्य जनता व मध्यमवर्गीयांच्या घरावर सोन्याची कौलेच चढणार आहेत अशा पद्धतीचा गाजावाजा सुरू झाला आहे.’

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
