AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'आम्ही तुतारी वाजवायला तयार', जयंत पाटलांच्या 'त्या' ऑफरवर वसंत मोरे यांचं थेट प्रत्युत्तर

‘आम्ही तुतारी वाजवायला तयार’, जयंत पाटलांच्या ‘त्या’ ऑफरवर वसंत मोरे यांचं थेट प्रत्युत्तर

| Updated on: Nov 11, 2024 | 2:42 PM
Share

'वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो', असं वक्तव्य जयंत पाटील यांनी काल कात्रजच्या सभेत केलं. त्यानंतर पुण्यात चर्चांना एकच उधाण आलं. यावर काय म्हणाले वसंत मोरे?

पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात काल कात्रज चौकात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली. हडपसर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगपात यांच्यासाठी जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतली. यासभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भर सभेतून जयंत पाटील यांनी वसंत मोरेंच्या हाती कधीही तुतारी देऊ शकतो, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. अशातच वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू झाली. या सर्व चर्चांवर स्वतः वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी च जयंत पाटील यांना बोललो होतो. अवघ्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत. मी पहिल्यांदाच आयुष्यात राष्ट्रवादीच्या स्टेजवर बसलो होतो. आताच्या घडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीला देखील मशाल, तुतारी, हाताचा पंजा एकत्र राहिला पाहिजे ही खबरदारी घ्या. आम्ही हातात मशाल घेऊन कधीच तुतारी वाजवायची तयारी केलीय’, असं वसंत मोरे म्हणालेत.

Published on: Nov 11, 2024 02:42 PM