एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FB पेजला फॉलो, शपथविधीनंतर राजकीय वर्तुळात काय घडतंय?

एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FB पेजला फॉलो, शपथविधीनंतर राजकीय वर्तुळात काय घडतंय?

| Updated on: Dec 06, 2024 | 5:23 PM

एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांचं पेज फॉलो करण्यात आले आहे. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आल्याने याचा अर्थ नेमका काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून उद्धव ठाकरे यांचं पेज फॉलो करण्यात आले आहे. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आल्याने याचा अर्थ नेमका काय? याची दबक्या आवाज चर्चाही सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पेजला अनावधानाने फॉले केलं की महायुतीत हे शिंदेंचं दबावतंत्र आहे? अशा उलट-सुलट चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन केवळ चार जणांच्या पेजला फॉलो करण्यात आलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Published on: Dec 06, 2024 05:23 PM