आर. ओ. तात्या पाटील यांची मुलगी वैशाली पाटील यांचं भावनिक भाषण, त्या म्हणाल्या…
यावेळी आर. ओ. तात्या पाटील यांची मुलगी वैशाली पाटील यांनी भावणिक भाषण केले. त्याचबरोबर शिंदेंच्या बरोबर गेलेल्या आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली.
जळगाव : उद्धव ठाकरे यांनी आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. सभेला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी उसळली होती. यावेळी आर. ओ. तात्या पाटील यांची मुलगी वैशाली पाटील यांनी भावणिक भाषण केले. त्याचबरोबर शिंदेंच्या बरोबर गेलेल्या आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली. आज माझ्या मनात आनंद आणि वेदना अशा स्वरुपाचा संमिश्र दिवस आहे. आज तात्यासाहेब नाहीत. तात्यासाहेब नसताना उद्धव ठाकरे यांची सभा आहे. आनंद यासाठी की आज माझे वडील तात्यासाहेब यांचं स्वप्न पूर्ण होतंय, असं त्या म्हणाल्या. तर शिवसेनेनं या लोकांना सगळं देऊन ही कृतज्ञता दाखवली नाही. जर तात्या असते तर त्यांनी हे कदापी सहन केलं नसतं. त्यांनी शिवसैनिकांशी नातं तोडलं नसतं. बालासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली नसती. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसा नसता, त्यांना वाऱ्यावर सोडलं नसतं. तर हे शिवसैनिक ही शिवसेना अशी वाऱ्यावर सोडणार नाही असेही त्या म्हणाल्या.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली

