मी विधान परिषदेचा सदस्य, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य: उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले, “काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उप सभापती यांनी थोडं गुरुजीसारखं वागावं लागेल. मी विधान परिषदेचा, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य.

मुख्यमंत्री म्हणाले, “काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उप सभापती यांनी थोडं गुरुजीसारखं वागावं लागेल. मी विधान परिषदेचा, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य. अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी! हे ठिपके म्हणजे राज्यातील मतदार संघ. हे मतदार संघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होईल त्यात विकासाचे रंग भरण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यातून राज्य विकासाची सुंदर रांगोळी रंगणार आहे”

आता या ठिकाणी आजी माजी.. माजी सदस्य नाहीत अजून. अर्थसंकल्पात साधू संत यांचे दाखले द्यायचे आणि शेरो शायरी करायची हे बरोबर नाही. एखादा विषय मांडला, भूमिका मांडली तर मत व्यक्त केलं पाहिजे. तुमच्या वागणुकीकडे लोकांचं लक्ष असतं. एखाद्या विषयावरून सभेत गोंधळघालायचा, आरडाओरडा करायची हे योग्य नाही, या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोललो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जगात कुठेही नसेल तेवढी आरोग्य सुविधा आपण गेल्या दीड वर्षात वाढवली आहे. याचा आकडा समोर आला पाहिजे. इतर गोष्टींचा निधी आरोग्य सुविधांकडे वळवावे लागले, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI