Uddhav Thackeray : दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा… उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, बैठकीत काय म्हणाले?
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची सर्व खासदार आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केल्याच आपल्याला पाहायला मिळालं.
दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीमध्ये केलं. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं याची भाजपने रणनीती आखलेली होती, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवनमध्ये नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं या सगळ्यांची रणनीती भाजपकडून आखण्यात आली, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये केले. तर बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रात मोठं केलं त्यासोबत देशात मोठं केलं. परंतु जेव्हा भाजपची सत्ता देशामध्ये आली तेव्हा बाळासाहेबांनी काहीही त्यांच्याकडे मागितलं नाही. परंतु जेव्हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हा हाच भाजप शिवसेनेला संपवायला निघाला, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.