Uddhav Thackeray : त्यांनी भरल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही; उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्याच्या निरोप समारंभात भाषण केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्याच्या निरोप समारंभात भाषण केले. ते म्हणाले, अंबादास दानवे यांनी आपली टर्म पूर्ण केली आहे, पण मी याला निवृत्ती म्हणणार नाही. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ वक्तव्याचा उल्लेख करत ठाकरे यांनी चिमटा काढला, अंबादास, तुम्हीही म्हणायला हवे, ‘मी पुन्हा येईन’.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, आज काहीजण दानवे यांचे कौतुक करत आहेत, पण त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तेव्हा यांचे चेहरे कसे पडले होते, हे मला माहित आहे. अंबादास यांना भाजपच्या तालमीत तयार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, पण तुम्ही माझे काही नेले आहे, त्याचे आभार तुम्ही मानणार का? असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवे ‘सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाहीत’ असे म्हटले होते. याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाहीत, पण काहीजण भरलेल्या ताटातून उधळत निघाले. पद मिळाले नाही म्हणून दुसऱ्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. यामुळे शिंदे गटावर निशाणा साधला. ठाकरे यांनी अंबादास यांनी कधीही भरलेल्या ताटाशी विश्वासघात न केल्याचे सांगितले.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

